सोनिया यांना वाढदिनी सर्वपक्षीय नेत्यांच्या शुभेच्छा

sonia gandhi
sonia gandhi

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा 71 वा वाढदिवस शनिवारी उत्साहात साजरा झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्यदायी वातावरण होते. त्यांच्या 10, जनपथ या निवासस्थानी कार्यकर्ते आणि समर्थकांनी फटाके फोडून आपल्या नेत्याला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे महासचिव शकील अहमद, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, प्रिया दत्त, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आदींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

मोदी यांनी ट्‌विटरवरून सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या. ""काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्या. त्यांना दीर्घायु लाभो, ही सदिच्छा,'' असे मोदी यांनी म्हटले आहे. लालूप्रसाद यादव यांनी सोनिया गांधी यांना ट्विटरवरून भावनाप्रधान संदेश दिला आहे. ""समर्पण, त्याग, बलिदान व कठीण काळात असाधारण साहस दाखविणाऱ्या मॅडम श्रीमती सोनिया गांधीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,'' असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर सोनिया गांधी यांना शुभेच्छा देत शांततामय, आरोग्यदायी, सफल, समृद्ध आयुष्य चिंतले.

काँग्रेस पक्षानेही अधिकृत ट्विटर हॅंडलवर आपल्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. त्यात म्हटले आहे, की करुणामयी, मेहनती, निस्वार्थी, शांत व शांतचित्त तरीही धैर्यवान आणि खंबीर. सर्व समस्यांविरोधात सशक्तीकरणाचे उदाहरण. एक आई, एक दोस्त. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com