आरोपीस विचारायचंय, का मारलंस तू?

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

प्रद्युम्नच्या आईचा टाहो; पोलिसांकडून स्वत:चा बचाव

गुरुग्राम  : येथील "रायन इंटरनॅशनल स्कूल'मध्ये शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर या चिमुरड्याच्या खूनप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता अकरावातील विद्यार्थ्यास ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणास वेगळीच कलाटणी मिळाली होती. "सीबीआय'च्या तपासामुळे स्थानिक पोलिस यंत्रणेचे बिंग फुटले होते, याबाबत आज माध्यमांशी बोलताना प्रद्युम्नची आई भावूक झाली होती. "सीबीआय'ने अटक केलेल्या आरोपीस मला भेटायचं आहे, त्यानं माझ्या प्रद्युम्नला का मारलं, हे त्याला विचारायचं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, "सीबीआय'च्या तपासामुळे बॅकफूटवर गेलेल्या हरियाना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यामुळेच आम्ही आरोपपत्र सादर केले नव्हते, असे म्हटले आहे. आम्ही या प्रकरणामध्ये कोणतीही कहाणी रचलेली नाही तसेच कोणालाही बळजबरीने आरोपी केलेले नाही, असे गुरुग्रामचे पोलिस आयुक्त संदीप खिरवार यांनी सांगितले.

मी भानावर नव्हतो : आरोपी
मीच प्रद्युम्नची हत्या केली असून तेव्हा मी भानावर नव्हतो. काय करतोय, मला काहीच समजत नव्हतं, अशी कबुली "रायन इंटरनॅशनल स्कूल'मध्ये शिकणाऱ्या अकरावीतील विद्यार्थ्याने दिली आहे. काहीतरी सांगायचं आहे, असे सांगून या विद्यार्थ्याने प्रद्युम्नला स्वच्छतागृहामध्ये बोलावले आणि तेथेच त्याची गळा चिरून हत्या केल्याचे "सीबीआय'च्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Web Title: new delhi news student pradyuman thakur mother question