सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: स्थितिदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेल्या तपासासंबंधी तीन दिवसांत स्थितिदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली पोलिसांना दिले.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करण्यासंबंधी सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीश जी. एस. सिस्तानी आणि न्यायाधीश चंद्र शेखर यांच्या खंडपीठाने पोलिसांना तीन दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

चौकशी पथकाने या प्रकरणाचा स्थितिदर्शक अहवाल न्यायालयाच्या आवारात दिल्यामुळे तो न्यायालयासमोर सादर करण्यापूर्वी वाचावा लागेल, असे दिल्ली पोलिसांचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितल्यामुळे न्यायालयाने हे निर्देश दिले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली.