काळ्या पैशासंबंधी भारताला सहकार्य करण्यास कटिबद्ध

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा लियुथार्ड यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली: काळ्या पैशाच्या विरोधातील भारताच्या लढाईत माहितीच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा डोरिस लियुथार्ड यांनी येथे स्पष्ट केले.

दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संबंधाला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमांची सुरवात करताना काल रात्री येथील स्वित्झर्लंड दूतावासात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.

डोरिस म्हणाल्या, की भारत एक चांगला मित्र आहे. या सात दशकांत आम्ही एकमेकांचे ऐकले, सल्ला दिला आणि एकमेकांकडून शिकलो. हाच तो आधार आहे, ज्यावर आज संबंध कायम आहेत. त्यातूनच आम्ही काळ्या पैशाच्या लढाईत भारताला सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. या वर्षी आम्ही आमच्या संसदेत याची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत आहोत.

आपल्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांनी काळ्या पैशाच्या विरोधातील लढाई आणि अनेक क्षेत्रांतील सहकार्यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी द्विपक्षीय चर्चा केली.