राजकारणापासून लष्कराला ठेवा दूर: लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

संरक्षण दलातील हुतात्मा जवान आणि अपंगत्व आलेल्या जवानांच्या मुलांना शिक्षणासाठी म्हणून दरमहा देण्यात येणाऱ्या साह्यावर मर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. यावरून काही प्रमाणात असंतोष असून, हा मुद्दा संरक्षण मंत्रालयासमोर मांडण्यात येईल.
- सुनील लांबा, नौदलप्रमुख

नवी दिल्ली : सशस्त्र दले आणि लष्कराचे राजकीयीकरण सुरू होते. आता त्यांना कोणत्याही प्रकारे राजकारणापासून दूर ठेवायला हवे, असे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी व्यक्त केले.

रावत म्हणाले, की आधी संरक्षण दलांमध्ये स्त्री आणि राजकारण या विषयांवर चर्चा न करण्याचा एक प्रकारे अलिखित नियम होता. आता मात्र, या विषयांचा शिरकाव संरक्षण दलांमध्ये झाला असून, हे टाळायला हवे. राजकारणापासून लष्कराला दूर ठेवायला हवे. मागील काळात लष्कराचे राजकीयीकरण झाले होते. आपण अतिशय धर्मनिरपेक्ष वातावरणात काम करीत आहोत. आपली लोकशाही ही अतिशय जिवंत असल्याने लष्कराला राजकारणाबाहेरच ठेवायला हवे.

लष्करी संस्था अथवा अधिकाऱ्यांचा विषय आला की त्यामध्ये राजकीय पक्षाचे नाव आता जोडले जात आहे. ते टाळण्याची गरज आहे. संरक्षण दले देशाच्या राजकीय घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी त्यांचे काम योग्य पद्धतीने करीत आहेत, असे रावत यांनी सांगितले.

Web Title: new delhi news Take away the military from politics: Army Chief