दिल्लीत टोमॅटो 70 रुपये किलो!

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

टोमॅटो ही नाशवंत वस्तू आहे. टोमॅटोची भाववाढ ही तात्पुरती असून, भावावर सरकार लक्ष ठेवून आहे. टोमॅटोचा कृत्रिम तुटवडा करून भाववाढ होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.
- रामविलास पासवान, केंद्रीय अन्न व ग्राहक कल्याणमंत्री

उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसल्याने भाववाढ

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून, टोमॅटोसाठी प्रतिकिलो 60 ते 70 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. देशातील अन्य महानगरांमध्येही टोमॅटोचे भाव वाढले आहेत.

देशातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये खराब हवामानामुळे पिकाचे नुकसान झाल्याने त्याची परिणती भाववाढ होण्यात झाली आहे. हरियानासह अन्य राज्यांमध्ये उन्हाळ्यात वाढलेले तापमान आणि नंतर झालेला मोठा पाऊस यामुळे टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती दिल्लीतील व्यापाऱ्यांनी दिली. टोमॅटोचे भाव कोलकत्यात 50 रुपये, चेन्नई 40 ते 45 रुपये आणि मुंबईत 35 ते 40 रुपये किलो आहेत. दिल्लीत मदर डेअरीच्या सफल विक्री केंद्रात टोमॅटोची विक्री 60 रुपये किलोने सुरू आहे. ऑनलाइन विक्री करणाऱ्या ग्रोफर्स आणि नेचर्स बास्केटवर टोमॅटोची विक्री 45 ते 48 रुपये किलो आहे.

दक्षिण भारतातही टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून दक्षिणेकडील राज्यांत टोमॅटोचा पुरवठा सुरू आहे. टोमॅटोचे उत्पादन जुलै 2016 ते जून 2017 या काळात देशभरात 15 टक्‍क्‍यांनी वाढले असून, ते 187 लाख टनांवर गेले, अशी आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM