मोदी, 'सॉरी' म्हणण्याची तसदी घ्याल का?

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू करणे ही मोठी घोडचूक होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करणार का, यासाठी देशातील नागरिकांना 'सॉरी' म्हणण्याची तसदी घेणार का, असा सवाल राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांनी केला.

काही दिवसांपूर्वी प्रकाश राज यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवर पंतप्रधान गप्प का आहेत असे म्हणत "पंतप्रधान मोदी हे माझ्यापेक्षा उत्तम अभिनेते आहेत. ते अशा पुरस्कारास पात्र आहे", असे वक्तव्य

केले होते. त्यानंतर आज (गुरुवार) पुन्हा एकदा प्रकाश राज यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय अचानक लागू केला होता. त्यानंतर

अनेकांनी त्यांच्याकडील असलेला काळापैसा पांढरा केला. यातील असंख्य चलनी नोटा असंघटित विभागातील व्यवहार रोखीने करण्यात आले.

तसेच श्रीमंतांनी त्यांच्याकडील काळापैसा नव्या कोऱ्या नोटांमध्ये रुपांतरित केला. त्यामुळे या विघातक अशा कृत्यामुळे लाखो मदतहीन झाले. याशिवाय असंख्य कर्मचाऱ्यांना जागो-जागी भटकावे लागले. या त्रासामुळे

पंतप्रधान मोदी 'सॉरी' म्हणण्याची तसदी घेणार का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :