राजधानीत अल्पवयीन मुलीवर शेजाऱयाकडून बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

नवी दिल्ली- एका तीन वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱया युवकाने बलात्कार केल्याची घटना मध्य शहरामध्ये घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्य भागात असलेल्या अनंद प्रभात येथे बुधवारी (ता. 3) बलात्काराची घटना घडली. विजय (वय 22) या युवकाने शेजारी राहणाऱया तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केला असून, त्याला त्याच्या मित्राच्या घरामधून बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलीची प्रकृती अतिशय गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडीत मुलगी बुधवारी सकाळी घरासमोर खेळत होती. यावेळी विजयने तिला आपल्या घरात बोलून घेऊन बलात्कार केला. विजय हा रोजंदारीचे काम करतो. पीडीत मुलीच्या घरच्यांनी तिचा शोध घेणे सुरू केले होते. यावेळी एकाने विजयसोबत तिला पाहिल्याचे सांगितले. यामुळे त्याच्या घरामध्ये जाऊन पाहिले असता मुलगी रक्तबंबाळ व बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017