अजित दोवाल चीन दौऱ्यावर; "ब्रिक्‍स' देशांच्या बैठकीत सहभागी होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

नवी दिल्ली: भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाचा उभय देशांतील राजकीय संबंधांवर कोणताही परिणाम झालेला नसून देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे पुढील महिन्यात "ब्रिक्‍स' राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बीजिंगला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गोपाळ बागले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ही माहिती दिली.

चीनसोबतच्या चर्चेसाठी आमची राजकीय कवाडे खुली असून, याबाबत भारताने स्वीकारलेल्या भूमिकेमध्ये सातत्य आहे. आमचा भर चर्चेवर असून, याबाबतची आणखी संवेदनशील माहिती उघड केली जाऊ शकत नाही. चीनसोबत असलेल्या तणावाबाबत भारत जगभरातील नेत्यांशी चर्चा करतो आहे. सीमावादाशी संबंधित प्रत्येक मुद्यावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. भूतानसोबत आमचे सांस्कृतिक संबंध असल्याचेही त्यांनी नमूद केले. डोकलाममधील समस्या आम्हाला शांततेच्या मार्गाने सोडवायची असून सीमेपलीकडील दहशतवादाबाबत आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा भंडाफोड केला आहे. पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनबाबत आम्ही जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांना इशारा दिल्याचेही बागले यांनी स्पष्ट केले.