तीन देशांच्या दौऱ्यानंतर मोदी भारतात परतले

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

नवी दिल्ली: अमेरिकासह पोर्तुगाल, नेदरलॅंड या देशांचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारतात परतले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली: अमेरिकासह पोर्तुगाल, नेदरलॅंड या देशांचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारतात परतले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

चार दिवसांच्या या दौऱ्यात मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मोदी यांचा पहिलाच अमेरिका दौरा होता. या दोन्ही नेत्यांनी चर्चेत दहशतवादावर परस्पर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. सीमेपलीकडील दहशतवादासाठी हल्ल्यांसाठी आपल्या भूभागाचा वापर होऊ न देण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मोदी व ट्रम्प यांनी पाकिस्तानला केले. या दौऱ्यात मोदी यांनी प्रथम पोर्तुगालला भेट देऊन अध्यक्ष अन्टोनियो कोस्टा यांच्याशी चर्चा केली. परतीच्या प्रवासात त्यांनी नेदरलॅंडच्या भेटीत अध्यक्ष मार्क रुट यांची भेट घेतली. या सर्व देशांमधील भारतीयांशीही त्यांनी संवाद साधला.