राहुल गांधीच म्हणतात, नितीन गडकरी खरे बोलले 

rahul gandhi nitin gadkari
rahul gandhi nitin gadkari

नवी दिल्ली : नितीन गडकरी यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांसंबंधी दिलेल्या स्पष्टीकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.

कलर्स टिव्ही या मराठी वाहिनीवर मागील आठवड्यात 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व अभिनेता नाना पाटेकर सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे निवेदक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गडकरी यांना राजकीय प्रश्न केले. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले त्यावर चर्चा तसेच टिकाही झाली होती. यावरच भाष्य करणारी पोस्ट व गडकरींची चित्रफीत राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर करत पुन्हा एकदा टीका केली आहे. 

'2014 मध्ये आम्ही सत्तेत येणारच नाही असा आम्हाला पूर्ण विश्वास होता, म्हणून आम्ही लोकांना आश्वासने देत गेलो, पण नेमके आम्ही सत्तेत आलो.' अशा प्रकारचे वक्तव्य गडकरी यांनी अनासपुरे यांच्या एका प्रश्नावर दिले होते. यावरच प्रतिक्रिया देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'खरं बोलले, या सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी जनतेच्या स्वप्नांची व विश्वासाची शिकार केली' अशा शब्दात टीका केली आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com