शरद यादव नितीश कुमारांवर नाराज; राहुल गांधींची घेतली भेट

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

पाटणा : नितीश कुमार यांनी त्यांचे सरकार 'रिसेट' केल्याने त्यांचे पूर्वीपासूनचे सहकारी ज्येष्ठ नेते शरद यादवदेखील नाराज झाले आहेत. नितीश यांनी महाआघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शरद यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. 

नितीश कुमार यांचा शपथविधी समारंभ पाटणा येथे पार पडत असताना शरद यादव हे राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीला गेले होते. राहुल गांधी यांनी नितीश यांच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर काही वेळातच शरद यादव यांनी त्यांची भेट घेतली. त्यावरून बिहारमधील नेत्यांची नितीश यांच्या निर्णयाबद्दलची अस्वस्थता स्पष्ट होते. 

शरद यादव यांनी संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाचा विस्तार करण्यात नितीश कुमार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यांनाही नितीश यांनी भाजपसोबत जाण्याचा नर्णय घेताना विश्वासात घेतलेले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काल (बुधवार) संध्याकाळी ऐन प्राईम टाईमच्या मोक्यावर नितीशकुमार यांनी राजीनामा देत महाआघाडी तोडली आणि आपला पूर्वाश्रमीचा जोडीदार भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 
दरम्यान, शरद यादव हे संध्याकाळी खासदार अली अन्वर यांच्यासह इतर नेत्यांची बैठक घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: