मोदींना नितीशकुमार उत्तम पर्याय ठरू शकतात : जेडीयू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. पाचपैकी तब्बल चार राज्यांत भाजपने सरकार स्थापन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते संजय सिंह म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय निर्माण करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे. नितीशकुमार हे मोदींना उत्तम पर्याय ठरू शकतात.'

पाटना (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उत्तम पर्याय ठरू शकतात असे म्हणत संयुक्त जनता दलाने मोदींविरूद्ध लढण्यासाठी आणि नितीशकुमारांना पाठिंबा देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. पाचपैकी तब्बल चार राज्यांत भाजपने सरकार स्थापन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते संजय सिंह म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय निर्माण करण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे. नितीशकुमार हे मोदींना उत्तम पर्याय ठरू शकतात.'

दरम्यान, पाच राज्यांतील निकालानंतर भारतीय जनता पक्षातील श्रेष्ठींनी पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आगामी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. "पक्षाला मिळालेला विजय हा जातिवाद, घराणेशाही, भ्रष्टाचाराला विरोध आणि मोदींच्या नेतृत्त्वाला मिळालेल्या पसंतीची पावती आहे', अशा सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत.