जयललितांच्या मृत्यूप्रसंगी नातेवाईक दूरच...

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

चेन्नई- तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युप्रसंगी त्यांचे जवळचे नातेवाईक दूरच राहिले. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत राहिले फक्त पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक.

जयललिता यांच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित राहू शकले नाहीत. जयललिता यांच्या भावाची मुलगी व तिच्या पतीने एकदा रुग्णालयात येऊन भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना बाहेरच अडविल्याने भेट होऊ शकली नाही, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

जयललिता यांनी व्ही. एन. सुधाकरन याला दत्तक घेतले होते. सन 1995 मध्ये मोठ्या उत्साहात त्याचा विवाह केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. सुधाकरनच्या विवाहानंतर त्यांचे जवळचे नातेवाईक दुरावले ते शेवटपर्यंत. शिवाय, विवाहानंतर सुधाकरनही दुरावला होता. जयललिता यांच्यावर उपचार सुरू असताना शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत राहिले केवळे कार्यकर्ते व समर्थक.

दरम्यान, तमिळनाडूमध्ये जयललिता यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. त्या लवकर बऱया होव्यात म्हणून अनेकजण प्रार्थना करत होते. एका समर्थकाचा मृत्यूही झाला. राज्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्याने अनेकांच्या मनात त्यांनी घर केले होते. मात्र, नातेवाईक शेवटपर्यंत दूरच राहिले.