'जल्लीकट्टू' यंदाही नाही; सुनावणीस नकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

पोंगल सणाला खेळला जाणारा बैलांच्या झुंजीचा हा खेळ तमिळनाडूत अत्यंत लोकप्रिय आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंध कायदा 1960मधील ज्या कलमाद्वारे जल्लीकट्टूवर बंदी घालण्यात आली आहे.

नवी दिल्ली - तमिळनाडूत लोकप्रिय असलेला 'जल्लीकट्टू' हा पारंपरिक खेळ यंदाही होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारच्या याचिकेवर शनिवारपर्यंत सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

जल्लीकट्टू आयोजित करण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याने यावरील बंदीचा फेरविचार करून पुढील आठवड्यात तो खेळण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती तमिळनाडू सरकारने केंद्राला सोमवारी केली होती. सर्वोच्च न्यायालयात आज याबाबत सुनावणी होणार होती. पण, न्यायालयाने या याचिकेवरील निर्णयाची तयारी करण्यात येत असून, शनिवारपूर्वी त्या निर्णय देणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शनिवारी मकर संक्रांतीवेळी होणारा हा खेळ यंदाही होणार नाही, हे निश्चित आहे.  

पोंगल सणाला खेळला जाणारा बैलांच्या झुंजीचा हा खेळ तमिळनाडूत अत्यंत लोकप्रिय आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंध कायदा 1960मधील ज्या कलमाद्वारे जल्लीकट्टूवर बंदी घालण्यात आली आहे.