'बेजबाबदार मागण्यांना उत्तर देण्याची गरज नाही'

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - "सर्जिकल स्ट्राईक‘बाबत पुरावा मागणाऱ्या कॉंग्रेसला "अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्याला आणि मागण्यांना उत्तर देण्याची गरज नाही‘ असे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली - "सर्जिकल स्ट्राईक‘बाबत पुरावा मागणाऱ्या कॉंग्रेसला "अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्याला आणि मागण्यांना उत्तर देण्याची गरज नाही‘ असे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना नायडू म्हणाले, "आम्हाला कोणासोबतही युद्ध किंवा भांडण करायचे नाहीत. मात्र कोणी जर आम्हाला डिवचले तर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. येथेही काही लोक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याप्रमाणे लष्कराने "सर्जिकल स्ट्राईक‘ केले त्याप्रमाणे आम्हीही त्या लोकांना शांतपणे हाताळणार आहोत‘ तसेच बेजबाबदार वक्तव्य आणि मागण्यांवर उत्तर देण्याची गरज नसल्याचेही ते पुढे म्हणाले. तसेच अन्य कोणत्याही ("आप‘ आणि "कॉंग्रेस‘ वगळता) भारतीयाला भारतीय लष्कराच्या श्रेयाबाबत आणि बांधिलकीबाबत कोणतीही शंका नसल्याचेही ते पुढे म्हणाले.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी "सरकारने जवानांच्या कारवाईचा राजकीय फायदा घेऊ नये. भारतीय सैनिकांच्या ताकदीचा गर्व आहे, पण भारतीय जनता पक्ष (भाजप) राजकीय फायदा घेत आहे. देशाचे जवान हुतात्मा होत असताना भाजप त्याचा राजकीय फायदा उचलत आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आली‘, असे वक्तव्य करत "सर्जिकल स्ट्राईक‘ हवेत पण खोटे नकोत अशी मागणी निरुपम यांनी केली.