राम मंदिर उभारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही: साक्षी महाराज

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

राम मंदिर उभारण्यापासून रोखणारी शक्ती आता या पृथ्वीवर नाही. अयोध्यात राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदायाचाही पाठिंबा मिळत आहे. राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद हा वाद हा मिटला आहे.

नवी दिल्ली - अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. 

लखनौमधील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयात आज (मंगळवार) भाजप नेते लालकृष्ण अडवानी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्या या प्रकरणी आरोप निश्चिती होणार आहे. त्यापूर्वीच साक्षी महाराज यांनी अयोध्येतील राम मंदिराविषयी वक्तव्य केले आहे.

साक्षी महाराज म्हणाले, की राम मंदिर उभारण्यापासून रोखणारी शक्ती आता या पृथ्वीवर नाही. अयोध्यात राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदायाचाही पाठिंबा मिळत आहे. राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद हा वाद हा मिटला आहे. त्यावेळी राम मंदिराला विरोध करणारे आता राम भक्त बनले आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
मॉन्सून आला रे! केरळच्या किनारपट्टीवर दाखल​
बारावीचा 89.50% निकाल; मुलींची बाजी​
'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक

गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
यूपीत मंत्र्यांकडून बारचे उद्घाटन; योगींनी मागितले स्पष्टीकरण
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
आपल्यासाठी देश प्रथम हवा: नौदल प्रमुख लांबा​