रामदेव बाबांविरोधात अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

रोहतक येथील जिल्हा न्यायालयाने रामदेव बाबांविरोधात वॉरंट काढले असून, पोलिस अधीक्षकांना रामदेवबाबांना अटक करून न्यायालयात आणण्याचे आदेश दिले आहेत.

रोहतक - योगगुरु रामदेव बाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

रोहतक येथील जिल्हा न्यायालयाने रामदेव बाबांविरोधात वॉरंट काढले असून, पोलिस अधीक्षकांना रामदेव बाबांना अटक करून न्यायालयात आणण्याचे आदेश दिले आहेत. रामदेव बाबा यांनी भारत माता की जय न म्हणणाऱ्यांचा शिरच्छेद करायला हवा, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून काँग्रेसचे माजी मंत्री सुभाष बत्रा यांनी खटला दाखल केला होता.

या प्रकरणी अनेकवेळा सुनावणी होऊनही रामदेव बाबा सुनावणीसाठी गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. न्यायाधीश हरिश गोयल यांनी रामदेवबाबांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार: मुख्यमंत्री फडणवीस
कर्जमाफीचे श्रेय नक्की कोणाचे?​
नक्षत्रांचं देणं... ​
युद्धाचे आदेश देणाऱ्यांना लढायला पाठवावे: सलमान खान​
जनलोकपाल व "लोकायुक्त'साठी पुन्हा जंतरमंतर गाठणार - अण्णा हजारे​