ईशान्येला करायचंय आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार- मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

भारत सेवाश्रम संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे संवाद साधला.

नवी दिल्ली : ईशान्य भारताची ओळख आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार म्हणून करण्यासाठी या भागातील सात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकार भर देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

ईशान्येकडील सात राज्यांमध्ये रस्ते आणि महामार्गांचा विकास करण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. भारत सेवाश्रम संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे संवाद साधला.

त्यावेळी मोदी म्हणाले, की देशातील पहिल्या 50 स्वच्छ शहरांमध्ये ईशान्य भारतातील फक्त गंगटोक शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे स्वच्छता हे या विभागातील प्रत्येक नागरिकासमोरील आव्हान आहे.