'तो पैसा माझा नव्हे', बेपत्ता महेश शहाचा खुलासा

पीटीआय
रविवार, 4 डिसेंबर 2016

अहमदाबाद - तब्बल 13 हजार 860 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जाहीर करणारे गुजरातमधील व्यावसायिक महेश शाह अचानक बेपत्ता झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असताना त्यांनी आज अचानक प्रकट होत हा पैसा आपला नाही, असा खुलासा केला आहे. वेळ आल्यानंतर आपण याबाबत प्राप्तीकर विभागाला माहिती देवू, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात केंद्र सरकारने शेवटची संधी म्हणून एका योजनेची घोषणा केल्यानंतर शाह यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्याकडील संपत्ती जाहीर केली होती. या रकमेवरील कराचा पहिला हप्ता 1560 कोटी रुपये भरण्यापूर्वी ते अचानक बेपत्ता झाले होते. प्राप्तिकर विभागाने त्यांचा शोधही सुरु केला होता. मात्र, आज अचानकपणे ते समोर आले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत त्यांनी ही रक्कम आपली नसल्याचे सांगितले. कमिशनपोटी आपण काळा पैसा पांढरा करुन देण्यास आपण तयार झालो होते. आपण फरार झालो नसून भितीपोटी आपण कराचा पहिला हप्ता भरला नाही. आपल्या कुटुंबियांचा या प्रकरणाशी संबंध नसून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये. त्यांच्या सुरक्षेची हमी मिळावी. असे शाह बोलताना म्हणाले.

दरम्यान, प्राप्तीकर विभागाने शाह यांची कार्यालये व संबंधित ठिकाणांवर छापे टाकले असून त्यांच्या व्यवसायाचे लेखापरीक्षण करणाऱ्या अप्पाजी अमीन या कंपनीचीही झाडाझडती घेतली होती.

देश

मुझफ्फरनगरजवळ १४ डबे रुळावरून खाली मुझफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील खतौलीजवळ (जि. मुझफ्फरनगर) शनिवारी (ता. १९) पुरी-हरिद्वार...

09.00 AM

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017