आमचा अणुकार्यक्रम स्वसंरक्षणासाठी - पाक

यूएनआय
मंगळवार, 29 मे 2018

पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हा फक्त स्वसंरक्षणासाठी असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने आज व्यक्त केले.
 

इस्लामाबाद - पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हा फक्त स्वसंरक्षणासाठी असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने आज व्यक्त केले.

भारताने 1998मध्ये अणुचाचणी केल्यानंतर लगेचच पाकिस्ताननेही अणुचाचणी केली होती. या अणुचाचणीला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल म्हणाले की, शेजारी देशाने अणुचाचणी घेतल्यामुळे पाकिस्तानलाही त्याच मार्गावर पावले टाकावी लागली. असे असले तरी पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हा स्वसंरक्षणासाठी आणि सामरीक स्थैर्य निर्माण करण्यासाठी आहे. आण्विक निशस्त्रीकरण आणि जागतिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी आमचा देश कटिबद्ध आहे.

Web Title: Nuclear program is for Pakistan's own self defense says pakistan