गोव्यात आयरिश तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

मृत तरुणीच्या मैत्रिणीनेही या प्रकरणी काही उपयुक्त माहिती दिली असून आम्ही काही संशयितांची चौकशी सुरु केली आहे...

गोवा - दक्षिण गोव्यामधील एका निर्जन ठिकाणी एका 25 वर्षीय आयरिश तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्यासंदर्भातील शक्‍यतेचा पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित तरुणी तिच्या एका मैत्रिणीसह होळी साजरी करण्यासाठी येथे आली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

"ही तरुणी कोणाबरोबर होळी साजरी करत होती, याचा शोध घेण्यात येत आहे. मृत तरुणीच्या मैत्रिणीनेही या प्रकरणी काही उपयुक्त माहिती दिली असून आम्ही काही संशयितांची चौकशी सुरु केली आहे,'' असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

पोलिसांना या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचाही संशय आहे. यामुळे तिचा मृतदेह पणजीजवळील गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत व रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. याचबरोबर, तिच्या चेहऱ्यावर व मस्तकावर जखमाही दिसून आलया आहेत.