नायडूंच्या विधानाला विरोध म्हणजे देशविरोध : खर्गे

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - विद्यापीठात घडणाऱ्या घटनांना काँग्रेसमार्फत वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे विधान केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले होते. त्यास प्रत्युत्तर देत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नायडू यांच्या वक्तव्याला विरोध म्हणजे देशविरोध असल्याची टीका केली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी उमर खालीदला दिल्ली विद्यापीठात एका कार्यशाळेला निमंत्रित करण्यात आले होते. यावरून दिल्ली विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. या घटनांना वेगळा रंग देण्यात येत असल्याचा आरोप नायडू यांनी केला होता. "काही विद्यापीठांच्या परिसरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा पोचविल्याचे म्हटले जात आहे. या प्रकाराला काँग्रेस आणि डाव्यांकडून वेगळा रंग देण्यात येत आहे', असे नायडू म्हणाले होते.

या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना खर्गे म्हणाले, "वेंकय्या नायडू नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीबाबत बोलत असतात आणि जर कोणी त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्याला देशविरोधी किंवा भ्रष्ट ठरविले जाते. हे चुकीचे नाही का?' असा प्रश्‍नही खर्गे यांनी उपस्थित केला.