अन्‌ तिने नाल्यात दिला बाळाला जन्म

अन्‌ तिने नाल्यात दिला बाळाला जन्म

कोरापूट: रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर एका आदिवासी भागातील महिलेला शासकीय रुग्णालयाशेजारी असलेल्या नाल्यात आपल्या बाळाला जन्म द्यावा लागल्याची संतापजनक घटना ओडिशात समोर आली आहे.

सदर महिला ही दसमंतपूर भागातील जानीगुडा गावातील रहिवासी असून, ती शुक्रवारी तिची आई आणि बहिणीसमवेत शहीद लक्ष्मण नायक वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पतीला भेटण्यासाठी आली होती. तेथे या महिलेस अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिने मॅटर्निटी विभागाकडे धाव घेतली; मात्र कागदपत्रांअभावी तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास संबंधितांनी नकार दिला. नाइलाजास्तव तिने रुग्णालयाजवळ असलेल्या एका नाल्यात आपल्या बाळास जन्म दिला, अशी माहिती सदर महिलेच्या आईने दिली.

दरम्यान, या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर संबंधित रुग्णालयाने तातडीने महिलेसह तिच्या नवजात मुलीला रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. नवजात मुलीला एसएनसीयूत ठेवण्यात आले असून, या दोघींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com