जुन्या गाड्यांच्या 'फिटनेस' बाबत वाहतूक मंत्रालयाची महत्त्वाची घोषणा

मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
Vehicle Fitness Certificate News Updates
Vehicle Fitness Certificate News UpdatesSakal

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षापासून सरकारने नोंदणी केलेल्या स्वयंचलित चाचणी केंद्रातून वाहनांची फिटनेस घेणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय इतर कोणत्याही फिटनेस सेंटरमधील फिटनेस प्रमाणपत्र वैध असणार नसून, यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या मुदती दिल्या आहेत. दरम्यान, या संदर्भात जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या असून, नागरिकांना 30 दिवसांत सूचना करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. (Vehicle Fitness Certificate News Updates)

Vehicle Fitness Certificate News Updates
देशात आमदार-खासदारांविरोधात 5 हजार प्रकरणे प्रलंबित : SC

1 एप्रिल 2023 पासून अवजड वाहने आणि अवजड प्रवासी वाहने आणि मध्यम भार असलेली वाहने आणि प्रवासी वाहने आणि कमी वजनाच्या वाहनांना 1 जून 2024 पासून सरकारी मान्यताप्राप्त स्वयंचलित चाचणी केंद्रांवर फिटनेस करणे बंधनकारक असणार आहे. असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

Vehicle Fitness Certificate News Updates
कृषिमंत्र्यांचे राज्यसभेत महत्त्वाचे विधान; विधानसभेच्या निवडणुकांनंतर...

दरम्यान, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशनमधून (Automated Testing Station) फिटनेस घ्यावा लागणार असून, आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी दोन वर्षांसाठी आणि आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी एक वर्षांचे फिटनेस प्रमाणपत्र असणार आहे. याबाबतचे नागरिक त्यांचे आक्षेप आणि सूचना संयुक्त सचिव (परिवहन), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 यांना किंवा comments-morth@gov.in या ईमेलद्वारे पाठवू शकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com