गांधींची हत्या संघानेच केली- राहुल मतावर ठाम

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली- ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) महात्मा गांधी यांची हत्या केली‘ या 2014 मधील विधानावर आपण ठाम असून, खटल्याला तोंड देण्यास तयार आहोत, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. 

राहुल यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा खटला मागे घेण्यासाठीची याचिका त्यांनी माघारी घेतली. 

गांधी हत्येसंदर्भात न्यायालयापुढे ‘आरएसएस‘बाबत आरोप करण्याचे टाळल्याने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका झाली. महात्मा गांधींच्या हत्येला संपूर्ण ‘आरएसएस‘ संघटना जबाबदार आहे असा आरोप करण्याचा माझा उद्देश नाही असे राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यावरील अब्रुनुकसानीचा खटला मागे घेण्यात येईल असे वृत्त होते. 

टॅग्स