रस्ते अपघातात वर्षभरात दीड लाख नागरिकांचा मृत्यू - मनसुख मांडवीय

पीटीआय
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या अपघातांत सुमारे 1 लाख 46 हजार, 133 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. हे प्रमाण 2014 च्या तुलनेत वाढल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीय यांनी आज राज्यसभेत दिली.

मांडवीय म्हणाले, ''2015 या वर्षात झालेल्या अपघातांत 5 लाख 279 नागरिक जखमी झाले आहेत. 2014 मध्ये झालेल्या अपघातांत 1 लाख 39 हजार 671 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 4 लाख 93 हजार 474 नागरिक जखमी झाले होते. यावरून रस्ते अपघातांत वाढ झाल्याचे स्पष्ट होत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.''

गेल्या वर्षी देशभरात पाच लाख 1 हजार 423 अपघातांची नोंद झाली, तर हेच प्रमाण 2014 मध्ये 4 लाख 89 हजार 400 इतके होते. 2011 ते 2013 दरम्यान झालेल्या अपघातांत मृत्यू व जखमींच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले होते. मात्र, ही संख्या 2014 मध्ये वाढली, तर 2015 मध्येही त्यात वाढ झाल्याचे दिसून आले, असे मांडवीय यांनी सांगितले.

अपघातांचा "जीडीपी'वर परिणाम
संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक आयोगाच्या (यूएनइएससीएपी) पाहणीनुसार, रस्ते अपघातांचा फटका भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनालाही (जीडीपी) बसतो. याचे प्रमाण दरवर्षी 3 टक्के इतके आहे. हे प्रमाण पैशात मोजले असता ते 58 अब्ज डॉलरच्या घरात जाते.