सोन्याची तस्करी करणाऱ्या एकाला दिल्लीत अटक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

आपल्या शरीरात सोने लपवून त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिल्ली विमानतळावर अटक केली. तो बुधवारी बॅंकॉकहून येथे आला होता.

नवी दिल्ली - आपल्या शरीरात सोने लपवून त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिल्ली विमानतळावर अटक केली. तो बुधवारी बॅंकॉकहून येथे आला होता. विमानतळावर या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या बॅगमधून 998 ग्रॅम सोन आढळले. त्याची बाजारात किंमत ही 31 लाख 4 हजार इतकी होती. या प्रवाशाने हे सोने आपल्या शरीरात लपविले होते, अशी माहिती सीमा शुल्क विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे.

चौकशी दरम्यान गेल्या वेळच्या भारत भेटीच्या दरम्यान आपण तीन किलो सोने आणल्याची कबुली त्याने दिली. त्याचे बाजारातील किंमत 93 लाख 32 हजार इतकी आहे, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: One arrested in gold smuggled in Delhi