दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिसासह 2 नागरिकांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येत असताना दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.

श्रीनगर - काश्‍मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक पोलिस हुतात्मा झाला; तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले.

कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजार येथे पोलिसांच्या पथकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलिस हुतात्मा झाला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दहशतवादी फैयाज अहमद उर्फ सेठाला ठार मारण्यात आले. सेठा हा दहशतवादी 2015 पासून फरार होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) उधमपूर येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी त्याच्या शोधात होती. 

पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येत असताना दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. तर, एक जण जखमी झाला असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. 

Web Title: One more attack: cop, 2 civilians killed in J&K