धक्कादायक ! इंदूरमध्ये एक वर्षांच्या बालिकेवर बलात्कार

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

इंदूरमध्ये एका वर्षांच्या बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या बालिकेचा मृतदेह राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला. याबाबतचे वृत्त 'पीटीआयने' दिले आहे.

इंदूर : देशात होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कठुआ आणि उन्नवामध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता इंदूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. इंदूरमध्ये अवघ्या एक वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर आरोपीने बालिकेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Rape

इंदूरमध्ये एका वर्षांच्या बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या बालिकेचा मृतदेह राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला. याबाबतचे वृत्त 'पीटीआयने' दिले आहे. बालिकेचा मृतदेह सापडल्यानंतर एम. वाय. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बालिकेच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली. 

''सुनिल भील हा मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता. राजवाडा किल्ला परिसरातून सुनिलने बालिकेचे पहाटे पावणेपाचच्या सुमारास अपहरण केले होते. त्यादरम्यान बालिका तिच्या पालकांसोबत झोपली होती. सुनिलने बालिकेला 50 मीटर अंतरावरील इमारतीच्या बेसमेंटमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने तिची हत्या केली,'' अशी माहिती इंदूरचे उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी दिली. 

Web Title: One Year Old girl raped and killed in Indore basement