मीरा कुमार यांनी दाखल केला अर्ज

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

मीरा कुमार यांनी आज सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर संसदेत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नवी दिल्ली- संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज (बुधवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

मीरा कुमार यांनी आज सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर संसदेत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) लालूप्रसाद यादव आदी पक्षांचे नेते उपस्थि होते.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक 'दलित विरुद्ध दलित' अशी जातीच्या नव्हे, तर विचासरणीच्या जोरावर आपण लढत आहोत, असे सांगत विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी साबरमती येथील महात्मा गांधी आश्रमापासून प्रचार मोहिमेच्या प्रारंभाची घोषणा केली आहे. सर्वोच्च पदाची निवडणूक जातीमुळे चर्चेत आल्याची खंत व्यक्त करताना जात जमिनीत गाडून टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी ट्विटरवर अकाऊंट सुरु केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
1 जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे
फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या 200 कोटींवर!​
मुंबई: प्रकृती अस्वस्थामुळे मुस्तफा डोसा रुग्णालयात​
पुणे: आंद्रा धरणग्रस्तांचा सामुहिक जलसमाधीचा इशारा
प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज​
रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला​
वसुली, पीककर्जाचा प्रश्‍न कायम
कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री​