दार्जिलिंग रेल्वेच्या सुरक्षेबाबत जागतिक वारसा केंद्रास चिंता

पीटीआय
शुक्रवार, 21 जुलै 2017

"जेजीएम'च्या आंदोलनामुळे या रेल्वेच्या दोन स्थानकांचे नुकसान झाले आहे. त्याचे स्वरुप व नुकसानाचा अंदाजाविषयी माहिती घेण्याची सूचना "डब्ल्यूएचसी'ने केंद्राला पत्रांमधून केली आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक मेकटिल्ड रॉसलर यांनी दिली

दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल) - वेगळ्या गोरखालॅंडच्या मागणीवरून "गोरखा जनमुक्ती मोर्चा'ने (जेजीएम) पुकारलेल्या "दार्जिलिंग बंद' आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून याचा फटका "दार्जिलिंग हिमालयन रेल्वे'ला बसू शकतो अशी चिंता "जागतिक वारसा केंद्राने (वर्ल्ड हेरिटेज सेंटर-डब्ल्यूएचसी) व्यक्त केली.

पुढील वर्षी होणाऱ्या "वर्ल्ड हेरिटेज' समितीच्या बैठकीत यावर लक्ष वेधण्यात येण्याची शक्‍यता आहे.

"जेजीएम'च्या आंदोलनामुळे या रेल्वेच्या दोन स्थानकांचे नुकसान झाले आहे. त्याचे स्वरुप व नुकसानाचा अंदाजाविषयी माहिती घेण्याची सूचना "डब्ल्यूएचसी'ने केंद्राला पत्रांमधून केली आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक मेकटिल्ड रॉसलर यांनी दिली.

दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही पत्रातून विचारणा केली आहे. हा अमूल्य वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य देण्यास "युनेस्को' तयार असल्याचेही रॉसलर म्हणाल्या.