उर्वरित सैनिकांना 2 महिन्यांत "ओआरओपी' - पर्रीकर

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

बडगाम (जम्मू-काश्‍मीर) - केवळ एक लाख माजी सैनिकांना "वन रॅंक वन पेन्शन' योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि येत्या दोन महिन्यांत यावर तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे दिले.

सुमारे 20 लाखांपैकी केवळ एक लाख माजी सैनिकांना तांत्रिक किंवा कागदपत्रीय अडचणींमुळे निवृत्ती वेतन मिळत नाही. ही समस्या आम्ही येत्या दोन महिन्यांत सोडवू, असे पर्रीकर यांनी येथे माजी सैनिकांशी बोलताना सांगितले.

स्वतंत्र भारताचे पहिले परमवीरचक्र पुरस्कार विजेते मेजर सोमनाथ शर्मा तसेच 1947मध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना हुतात्मा झालेल्या अन्य जवानांना आदरांजली वाहण्यासाठी पर्रीकर येथे आले होते. या वेळी त्यांच्यासमवेत लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहागही उपस्थित होते.
"ओआरओपी'च्या मुद्यावर सरकार संवेदनशील असून, माजी सैनिक अंशकालीन आरोग्य योजनेचीही समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

छायाचित्राचा हव्यास असलेले राजकारणी दुसऱ्या दिवशी भिवानीत पोचले, यामध्ये कोण कोणावर मात करेल? राहुल गांधी की अरविंद केजरीवाल? त्यांची बांधिलकी कॅमेऱ्याशी आहे. माजी सैनिकाच्या कुटुंबीयांसाठी नाही.
- सिद्धार्थनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय सचिव

राहुल गांधी आणि त्यांचा कॉंग्रेस पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राइक आणि भोपाळ चकमकीनंतर आता "ओआरओपी'च्या मुद्यावरून देशात गोंधळाचे वातावरण तयार करत आहेत.
- मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री