पी. चिदंबरम यांना न्यायालयाचा दिलासा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच पाच जूनपर्यंत अटक न करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने आज दिला. 

नवी दिल्ली - एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच पाच जूनपर्यंत अटक न करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने आज दिला. 

या प्रकरणी सक्तवसुली संचनालय (ईडी) चिदंबरम यांना पाच जूनपर्यंत अटक करू शकत नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणात पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आरोपी करण्यात आले आहे. अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून चिदंबरम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी न्यायालयात चिदंबरम यांची बाजू मांडली. 
 

Web Title: p. chidambram Console by court