साक्षी मलिक, दीपा कर्माकरला पद्मश्री प्रदान

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. 

नवी दिल्ली - प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे आज (गुरुवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.

राष्ट्रपती भवनात आज हा पुरस्कार सोहळा पार पडला. जानेवारीमध्ये या पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे 89 जणांना पुरस्कार घोषित करण्यात आले होते. यात 19 महिला आणि 70 पुरुषांचा समावेश होता. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. 

पद्मश्री विजेते - 

 • विराट कोहली (क्रिकेटपटू)
 • साक्षी मलिक (कुस्तीपटू)
 • दीपा मलिक (पॅरालिंपिकपटू)
 • दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)
 • भावना सोमय्या (पत्रकार)
 • श्रीजेश (हॉकीपटू)
 • विकास गौडा (थाळीफेकपटू)
 • सी नायर (नर्तक)
 • अनुराधा पौडवाल (गायिका)
 • कैलाश खेर (गायक)
 • संजीव कपूर (शेफ)
 • नरेंद्र कोहली (लेखक)
 • कंबल सिब्बल
 • बसंती बिश्त (संगीत)
 • काशिनाथ पंडीत
 • अरुणा मोहंती (नृत्य)
 • भारती विष्णुवर्धन (चित्रपट)
 • साधू मेहर (चित्रपट)
 • टी. के. मूर्ती (संगीत)
 • लैशराम वीरेंद्रकुमार सिंह (संगीत)
 • कृष्ण राम चौधरी (संगीत)
 • जीतेंद्र हरपाल (संगीत)