अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत 3 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

जवानांकडून ठार मारण्यात आलेले तिन्ही दहशतवादी स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. यांची चौकशी करण्यात येत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील आवुरा गावातील एका घरात लपलेले दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार सायंकाळपासून ही चकमक सुरु होती. सुरक्षा रक्षकांना या घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षाकांवर गोळीबार केल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. या ठिकाणी मोठे स्फोटाचे आवाजही ऐकण्यात आले होते. सुमारे नऊ तास चाललेल्या या चकमकीनंतर दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांजवळील तीन एके47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

जवानांकडून ठार मारण्यात आलेले तिन्ही दहशतवादी स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. यांची चौकशी करण्यात येत आहे. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असण्याची शक्यता आहे.

देश

बंगळूर - गरिबांमधील गरिबांना परवडेल अशा दरात अन्न पुरविण्यासाठी "इंदिरा कॅंटिन'चे...

05.36 PM

गोरखपूर - नेपाळमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशमधील रापती व रोहिणी...

04.09 PM

नवी दिल्ली - भारत-चीन सीमारेषेवरील पूर्व लडाख भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी...

02.24 PM