पुँचमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार

वृत्तसंस्था
रविवार, 11 जून 2017

पाकिस्तानी सैन्याकडून सतत सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. एलओसीवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्या 13 दहशतवाद्यांना जवानांनी ठार मारले आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुँच जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लष्कराच्या चौक्या व गावांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुँच जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील लष्कराच्या चौक्या व सीमेवरील गावांवर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याकडून तोफगोळे आणि अत्याधुनिक शस्त्रांमधून गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांकडूनही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

पाकिस्तानी सैन्याकडून सतत सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. एलओसीवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्या 13 दहशतवाद्यांना जवानांनी ठार मारले आहे. गेल्या 96 तासांमध्ये जवानांनी ही कारवाई केली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी अशा प्रकारे गोळीबार करण्यात येतो. मात्र, भारतीय जवानांकडून घुसखोरीचे कट उधळून लावण्यात आले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी