पाकमध्ये अडकलेली महिला भारतात परतणार...

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

नवी दिल्लीः पाकिस्तानी नागरिकाने फसवूण विवाह केलेल्या भारतीय महिलेचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या महिलेला भारतात जाण्याची परवानगी आज (बुधवार) दिली.

उझ्मा असे भारतीय महिलेचे नाव आहे. ताहिर अली या पाकिस्तानी नागरिकाने बंदूकीचा धाक दाखवून उझ्माशी विवाह केला होता. शिवाय, विवाहानंतर तिचा छळ सुरू केला होता. या घटनेनंतर तिने भारतीय दूतावासाशी संपर्क साधून हे प्रकरण उजाडात आणले होते.

इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भारतात परतण्याची परवानगी मागितली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधिश मोहसिन अख्तर कयानी यांनी सुनावणीदरम्यान उझ्माला भारतात परतण्याची परवानगी दिली आहे. शिवाय, पोलिस संरक्षणामध्ये वाघा सीमेपर्यंत पोहचविण्याचे आदेश दिले आहेत.