पाक उच्चायुक्तालय 'आयएसआय'चा अड्डा

पीटीआय
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - येथील पाकिस्तानचे उच्चायुक्तालय हे "आयएसआयचा अड्डा' बनला असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालय सारे कायदे मोडत असून, केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, योग्य वेळी कारवाई करण्यात येईल, असेही पक्षाने म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना भाजपचे राष्ट्रीय चिटणीस श्रीकांत शर्मा म्हणाले, 'पाकिस्तानचे उच्चायुक्तालय हे खरे तर "आयएसआयचा अड्डा'च बनला आहे. राजनैतिक संबंध दृढ करण्याचे काम येथे होतच नाही. माहिती चोरून ती पाकिस्तानात पाठविण्याचे केंद्र म्हणूनच येथे काम चालते. केंद्र सरकारने याची दखल घेतली असून, योग्य वेळी कारवाई करण्यात येईल.''

बांगलादेशमध्ये हिंदूंवर, तसेच त्यांच्या मंदिरांवर होत असलेल्या हल्ले दुर्देवी असल्याचे सांगून ते म्हणाले, 'सरकार या प्रश्‍नी बांगलादेशशी नक्की चर्चा करेल.''

Web Title: Pakistan High Commission joint ISI spot