भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरले - पर्रीकर

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

पणजी - भारतीय लष्कराकडून सीमेवर पाकिस्तानी सैन्याला देण्यात येत असलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान घाबरले असून, त्यांच्याकडून गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार करण्यात आला नसल्याचे, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.

पणजीजवळील संखलिम येथे झालेल्या सभेत बोलताना पर्रीकर यांनी पाकिस्तानी सैन्य भारताच्या प्रत्युत्तरामुळे चिंतेत असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानला आता भारतीय सैन्याच्या हल्ल्याची जाणीव झाल्याचेही म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सीमेवरील गोळीबार बंद असल्याचे, पर्रीकरांनी म्हटले आहे.

पर्रीकर म्हणाले, की सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्याकडून छुप्या पद्धतीने गोळीबार सुरु होता. आपल्या लष्कराने याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून दोन दिवसांपूर्वी दूरध्वनी आला होता, त्यांनी गोळीबार रोखण्याची विनंती केली होती. त्यावेळी आम्हालाही प्रत्युत्तर करण्यात काही रस नसल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गोळीबार बंद आहे. 

Web Title: Pakistan Pleaded us to Stop 'Powerful Response', Says Manohar Parrikar