मोदी, संघ, हिंदुत्व पाकिस्तानच्या निशाण्यावर!

वृत्तसंस्था
रविवार, 9 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - उरी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक'मुळे अस्वस्थ झालेला पाकिस्तान भारताविरूद्ध नवनवे कट रचण्याच्या तयारीत आहे. भारतावर टीका करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासह हिंदुत्ववादी विचारणीला लक्ष्य करण्याची शिफारस पाकिस्तानच्या सिनेटमधील एका समितीने केली आहे.

"सर्जिकल स्ट्राईक'नंतर भारत-पाक सीमारेषेवर दहशतवादी हल्ले होत असून पाकनेही 29 सप्टेंबरपासून शनिवारपर्यंत तब्बल 25 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताला त्रस्त करण्यासाठी आणखी पर्यायांचा शोध घेण्यात येत आहे. "भारत आणि पाकिस्तानमधील संबंधाच्या परिस्थितीवर धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे' अशा शिर्षकाखाली सिनेच्या समितीने 22 मार्गदर्शक तत्त्वे असलेला अहवाल सादर केला असल्याचे पाकिस्तानमधील "एक्‍स्प्रेस ट्रिब्युन' या दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे. आहे.

"भारतामध्ये मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन आणि दलित वेगळे पडलेले आहेत आणि माओवाद्यांच्या कारवाया वाढलेल्या आहेत हीच भारताची त्रुटी आहे', असे अहवालात म्हटले आहे. तसेच "भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचारसरणीला लक्ष्य करण्यात यावे', अशी शिफारस करण्यात आली आहे. चुकून बलुचिस्तानमध्ये गेल्यानंतर अटक करण्यात आलेले कुलभूषण यादव हे "रॉ'चे गुप्तचर असल्याचे सांगण्याची शिफारसही सात पानांच्या अहवालात करण्यात आली आहे.
 
टॅग्स