जवानांना दुःखावणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे- राजनाथसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

अशा प्रक्षोभक कृत्यांना भारतीय लष्कराने अनेकवेळा उत्कृष्टरीत्या प्रत्त्युतर दिले आहे. सर्जिकल स्ट्रईक हे त्याचेच एक उदाहरण आहे.

- राजनाथसिंह

नवी दिल्ली : जवानांच्या अस्मितेला ठेच पोचवणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज व्यक्त केले. दिल्ली- देहरादून महामार्गावरील सुभारती विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

जगभरातील 20 राष्ट्रांच्या "बी-20' गटाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, "भारत भ्रष्टाचार व दहशतवाद यांच्याविरुद्ध लढा देत आहे. अशा परिस्थितीत जर विदेशी बॅंकांनी भारतीय नागरिकांच्या परदेशात असलेल्या बॅंक खात्यांची माहिती पुरवली नाही तर भ्रष्टाचाराला रोख लावणे अवघड होईल, असेही राजनाथसिंह यांनी नमूद केले. 

तसेच भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करून त्याचे व्हिडिओ करण्याच्या पाकिस्तानच्या अमानूष कृत्यांबाबत ते म्हणाले, "अशा प्रक्षोभक कृत्यांना भारतीय लष्कराने अनेकवेळा उत्कृष्टरीत्या प्रत्त्युतर दिले आहे. सर्जिकल स्ट्रईक हे त्याचेच एक उदाहरण आहे.'' 
दरम्यान, लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी 24 तास उपलब्ध राहावे, असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी नोटाबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, भ्रष्टाचार, अर्थव्यवस्था व आंतरराष्ट्रीय कारभार या विषयांवर देखील चर्चा केली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

हौसला बुलंद हो, तो क्या कॅन्सर, क्या दसवीं!
वाघाच्या हल्ल्यात प्राणीसंग्रहालयातील महिला अधिकाऱ्याचा मृत्यू
'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक
दहशतवादी हल्ला झाला तर आपण पूर्ण तयार : नौदलप्रमुख
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी
गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'
लग्नानंतर फ्रीज, सोन्याची साखळी मागणाऱ्या पतीला अटक
दहशतवाद थांबेपर्यंत पाकशी क्रिकेट मालिका नाही