पूंछमध्ये पाकिस्तानचा गोळीबार;जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

या भागामधील सालोत्री आणि सग्रा येथील भारतीय ठाण्यांवर आज सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानने गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले.  भारताकडूनही पाकिस्तानच्या या आगळिकीस प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र दुदैवाने या हल्ल्यात भारताचा एका जवान हुतात्मा झाला.

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यातील पूंछ जिल्ह्यामधील कृष्ण घाटी भागामध्ये पाकिस्तानकडून आज (रविवार) सकाळी जोरदार गोळीबार करण्यात आला. या भागामधील सालोत्री आणि सग्रा येथील भारतीय ठाण्यांवर आज सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानने गोळीबार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारताकडूनही पाकिस्तानच्या या आगळिकीस प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र दुदैवाने या हल्ल्यात भारताचा एका जवान हुतात्मा झाला आहे.

याआधी, गेल्या 2 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आर्निया व राजौरी या सीमारेषेजवळील गावांतील आठ नागरिक मृत्युमुखी पडले होते. भारत व पाकिस्तानमधील सीमारेषेवरील परिस्थिती गेल्या काही महिन्यांत अत्यंत तणावग्रस्त झाली असून पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधी भंगास भारताकडूनही जोरदार उत्तर देण्यात येत आहे.

Web Title: pakistan violates ceasefire again