पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानी सैन्याने नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबारास सुरवात केली. हा गोळीबारात पहाटे दीडपर्यंत सुरु होता.

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने सोमवारी मध्यरात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी तालुक्यातील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबारास सुरवात केली. हा गोळीबारात पहाटे दीडपर्यंत सुरु होता. भारतीय जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याने 82 एमएम मॉर्टरही फेकले. या गोळीबारात एकही जवान जखमी झालेला नाही.

पाकिस्तानी सैन्याने दोन दिवसांपूर्वीच येथील चार चौक्यांवर गोळीबार केला होता. यामध्ये एक जवान हुतात्मा झाला होता. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरुच आहेत.