कुपवाड्यात पाकिस्तानकडून गोळीबार;दोन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

गेल्या सुमारे महिन्याभराच्या काळात पाकिस्तानकडून तब्बल 23 वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे. काश्‍मीरमधील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हे हल्ले अत्यंत संवेदनशील मानले जात आहेत

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्‍टरमधील ताबारेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने आज (बुधवार) केलेल्या गोळीबारामध्ये दोन भारतीय जवान हुतात्मा झाले. मध्य काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला आहे.

कालही पाकिस्तानकडून पूंछ भागामध्ये गोळीबार करण्यात येऊन शस्त्रसंधी कराराचा भंग करण्यात आला होता. गेल्या सुमारे महिन्याभराच्या काळात पाकिस्तानकडून तब्बल 23 वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे. काश्‍मीरमधील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हे हल्ले अत्यंत संवेदनशील मानले जात आहेत.