मोदींची पाकिस्तानी बहिण 23 वर्षांपासून बांधतेय राखी

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यापासून मी त्यांना राखी बांधत आहे. मोदी कठोर मेहनती आणि दुरदर्शी असल्यानेच ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यामुळे ते व्यस्त असतील. त्यामुळे यंदा मोदींना राखी बांधणार नव्हत्या. पण काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत: फोन करून रक्षाबंधनाची आठवण करून दिली.

नवी दिल्ली - सण हे नेहमीच एकमेकातील कटूता कमी करून सर्व धर्मीयांना एकत्र आणण्याचे काम करत असतात. असेच काही भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानलेली पाकिस्तानी बहिण गेल्या 23 वर्षांपासून त्यांना राखी बांधत असल्याचे समोर आले आहे. 

पंतप्रधान मोदींची पाकिस्तानातील एक मानलेली बहिण कमर मोहसिन शेख हिने आपण गेल्या 23 वर्षांपासून मोदींना राखी बांधत असल्याचा दावा केला आहे. तसेच त्या यंदाही पाकिस्तानमधून रक्षाबंधनासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. कमर शेख यांचा जन्म पाकिस्तानात झाला असला तरी त्या सध्या भारतात राहतात. 

कमर शेख यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यापासून मी त्यांना राखी बांधत आहे. मोदी कठोर मेहनती आणि दुरदर्शी असल्यानेच ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यामुळे ते व्यस्त असतील. त्यामुळे यंदा मोदींना राखी बांधणार नव्हत्या. पण काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत: फोन करून रक्षाबंधनाची आठवण करून दिली. लग्नानंतर मी भारतात आले. त्यावेळी सासरच्या मंडळीशिवाय मी कोणालाच ओळखत नव्हते. त्यावेळी मी दिल्लीत आले होते. तेंव्हा नरेंद्र मोदींशी भेट झाली. योगायोगाने त्या दिवशी रक्षाबंधन होते आणि त्या दिवसापासून भावा-बहिणीचे नाते जुळले.

पाकिस्तानमधील कराची शहरात राहत असलेल्या कमर शेख या सर्वप्रथम 1981 मध्ये भारतात आल्या. त्यांचा विवाह अहमदाबाद येथील प्रसिद्ध चित्रकार मोहसिन यांच्याबरोबर झाला. तेव्हापासून त्या भारतात वास्तव्यास आहेत. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :