'पाकच्या धोरणात लष्कराची महत्त्वाची भूमिका'

वृत्तसंस्था
रविवार, 9 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या भारतासंदर्भातील धोरणांबाबत लष्कराची महत्त्वाची भूमिका असल्याचा खुलासा पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या भारतासंदर्भातील धोरणांबाबत लष्कराची महत्त्वाची भूमिका असल्याचा खुलासा पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली. पाकिस्तानच्या लष्कराबाबत बोलताना त्यांनी भारताच्या पाकिस्तानसंदर्भातील धोरणांमध्येही लष्कराशी सल्लामसलत केली जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर कारवाई करण्याचे आदेश तेथील लष्कराला दिल्याचे वृत्त आहे. मात्र बासित यांच्या भूमिकेवरून भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेले संबंध सुरळित होण्यासाठी चर्चा करण्याचे कोणत्याही प्रकारचे संकेत नसल्याचे स्पष्टपणे आढळून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचारसरणीला पाकिस्तान लक्ष्य करण्याच्या विचारात आहे. त्यासंदर्भातील तेथील सिनेच्या एका समितीने अशी स्पष्ट शिफारस केल्याचेही वृत्त आहे.

Web Title: Pakistan's army an important role in policy making - Basit