पालघर, भंडारा-गोंदियाचा आज निकाल; जोरदार लढत

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

मतदान यंत्रातील बिघाडामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मुंबई - नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या आज (गुरुवारी) जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मतदान यंत्रातील बिघाडामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, कैराना लोकसभा पोटनिवडणुकीतही बुधवारी 73 केंद्रांवर फेरमतदान झाले. याठिकाणी 61 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली. महाराष्ट्रातील दोन, उत्तर प्रदेशातील एक आणि बिहारमधील एक लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. तर, 13 विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट होणार आहेत. 

Web Title: Palghar Bhandra-Gondia Kairana loksabha bypoll result