पप्पू यादव यांची तुरुंगातून सुटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पाटणा: पाटणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांची आज 25 दिवसांनंतर बेऊर तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर यादव यांनी खासगी साखर कारखान्याच्या आत्महत्या केलेल्या कामगार संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. प्रत्येक कुटुंबाला जनाधिकार पक्षाच्या वतीने 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.

"मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना या कुुटुंबीयांची भेट घेण्यास वेळ नाही. परंतु मला त्यांचे सांत्वन करणे महत्त्वाचे वाटले,'' असे यादव यांनी सांगितले.

नितीशकुमार सरकारच्या विरोधात गेल्या महिन्यात 27 मार्च रोजी विधान भवनाबाहेर पप्पू यादव समर्थकांनी केलेल्या निदर्शनांच्यावेळी त्यांची पोलिसांबरोबर चकमक उडाली होती. त्यानंतर यादव यांना रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले होते.

Web Title: Pappu Yadav's release from jail