पालकांना ओलिस ठेवत चिमुकलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

लखनौ- पालकांना ओलिस ठेवत 12 वर्षाच्या मुलीवार पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिस अधिकारी मंझिल सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित मुलगी आपल्या पालकांसह घरी चालली होती. यावेळी एका टोळक्याने त्यांना रस्त्यामध्येच अडविले. मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घरापासून 600-700 मिटर अंतरावरच ही घटना घडली.'

दरम्यान, पीडीत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. जुलै महिन्यात अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवर बलात्काराची घटना घडली होती. उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणूक होत असून, सामूहिक बलात्कारांच्या घटनांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.